Posted on

26th Feb: जेव्हा देव 100 टक्के आमच्या पक्षाचा बनतो

त्या लोकांत आपणही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या
देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो.
(इफिस 2:3)

देवाचा सर्व क्रोध, सर्व दंडाज्ञा ज्यांस आम्ही पात्र आहोत, त्या सर्व येशूवर ओतण्यात आल्या.
सिद्ध नीतिमत्वासाठी देवाच्या सर्व मागण्या ख्रिस्ताद्वारे पूर्ण करण्यात आल्या. ज्या क्षणी
आपण (कृपेद्वारे!) हा खजिना पाहतो, आणि त्याचा या प्रकारे स्वीकार करतो, त्या क्षणी
त्याचा मृत्यू हा आपला मृत्यू आणि त्याची दंडाज्ञा ही आपली दंडाज्ञा आणि त्याचे नीतिमत्व
हे आपले नीतिमत्व असें गणले जाते आणि त्या क्षणी देव अपरिवर्तनीयपणे 100 टक्के
आपल्या पक्षाचा बनतो.

याने हा प्रश्न अनुत्तरित राहतो की, ”पवित्र शास्त्र हे शिकवीत नाही का की अनंतकाळात
देवाने निवडीमध्ये आमच्यावर आपली कृपा प्रकट केली?“

दुसऱ्या शब्दांत, विचारशील लोक विचारतील, “देव केवळ विश्वास आणि ख्रिस्तासोबत
ऐक्य व नीतिमान ठरविल्या जाण्याच्या क्षणी 100टक्के आपल्या पक्षाचा बनतो का?

जगाच्या स्थापनेच्या आधी निवडीच्या कार्यात तो 100 टक्के आपल्या पक्षाचा बनला नव्हता
का?“ इफिस 1:4-5 मध्ये पौल म्हणतो, “त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व
निर्दोष असावे, म्हणून त्याने (देवानें) जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी
निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे
स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते.”

मग देव अनंतकाळापासूनच 100 टक्के निवडलेल्यांच्या पक्षाचा बनत नाही का? उत्तर “100
टक्के”च्या अर्थावर आधारित आहे.

“100 टक्के” या संज्ञेद्वारे, मी पवित्रशास्त्राच्या कित्येक अनुच्छेदात आढळणारे बायबलचे सत्य
राखून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. उदाहरणार्थ, इफिस 2:3 मध्ये पौल म्हणतो की ख्रिस्ती
विश्वासणारे ख्रिस्त येशूमध्ये जिवंत करण्यापूर्वी “क्रोधाची प्रजा” होते : त्या लोकांत आपणही
सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या
इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो.

पौल म्हणतो की, आपल्या नव्या जन्मापूर्वी – म्हणजे आपल्याला ख्रिस्तासोबत जिवंत
करण्यापूर्वी – आपल्यावर देवाचा क्रोध होता. निवडलेले क्रोधाच्या अधीन होते. जेव्हा देवाने
आम्हाला ख्रिस्त येशूठायी जिवंत केले आणि ख्रिस्ताचे सत्य आणि सौंदर्य पाहण्यासाठी
आम्हाला जागृत केले तेव्हा हे बदलून गेले यासाठी की आम्ही त्याला आमच्यासाठी मृत्यू
पावलेला म्हणून आणि ज्याचे नीतिमत्व आमच्या येशूबरोबरच्या ऐक्यामुळे गणले गेले आहे
अशा व्यक्तीच्या रूपात ग्रहण करावे. आमच्यासोबत असे घडण्यापूर्वी आम्ही देवाच्या
क्रोधाच्या अधीन होतो. मग, ख्रिस्तामधील विश्वासामुळे आणि त्याच्याशी एकजुट झाल्या
कारणास्तव, देवाचा सर्व क्रोध दूर झाला आणि त्या अर्थाने, तो 100टक्के आपल्या पक्षाचा
झाला.

म्हणून, या सत्यामध्ये आनंदित व्हा की देव तुमचा सांभाळ करेल. तो तुम्हाला शेवटपर्यंत
टिकवून ठेवील कारण ख्रिस्ताठायी तो तुमच्यासाठी 100 टक्के आहे. आणि म्हणूनच,
शेवटपर्यंत पोहोचणे हे देवाला आपल्यासाठी 100 टक्के बनवत नाही. तो तुमच्यासाठी
आधीच 100 टक्के आहे या तथ्याचा तो परिणाम आहे.

Leave a Reply