Posted on

22 April: निर्भय होण्याची पाच कारणे

“हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे
वाटले आहे.“ (लूक 12:32)

पैशाबद्दल किंवा जगाच्या इतर गोष्टींबद्दल आपण भिती धरता कामा नये अशी देवाची
इच्छा आहे कारण ती निर्भयता – चिंतापासून मुक्ती – त्याच्याविषयी पाच महान गोष्टींत
आपली वाढ करील.

प्रथम, भयभीत न होणे हे दाखवते की आपण देवाला आपला मेंढपाळ म्हणून मूल्यवान
समझतो. “हे लहान कळपा, भिऊ नकोस.” आपण त्याचे कळप आहोत आणि तो आपला
मेंढपाळ आहे. आणि जर तो आपला मेंढपाळ आहे, तर स्तोत्र 23:1 लागू होते: “परमेश्वर
माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही” – म्हणजे, मला खरोखर ज्या गोष्टीची
गरज आहे त्यांची उणीव भासणार नाही.

दुसरे, न भिणे हे दाखवते की आम्ही देवाला आपला पिता म्हणून मूल्यवान समजतो.
“तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” आम्ही फक्त त्याचे लहान
कळप नाही; आम्ही त्याची मुले सुद्धा आहोत आणि तो आमचा पिता आहे. त्याला खरोखर
आमची काळजी आहे आणि आम्हाला काय हवे ते तो जाणतो आणि ज्याची तुम्हाला गरज
आहे ते तुमच्याजवळ आहे याची खात्री करण्यासाठी तो तुमच्यासाठी कार्य करेल.

तिसरे, चिंता न करणे हे दाखवते की आपण देवाला राजा म्हणून मूल्यवान समजतो. “हे
लहान कळपा, भिऊ नकोस, कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले
आहे.” तो आम्हाला “राज्य” देऊ शकतो कारण तो राजा आहे. जो आमची तरतूद करतो
त्यात हे सामर्थ्याचा एक प्रचंड घटक जोडते. “मेंढपाळ” संरक्षण आणि तरतूद दर्शवितो.
“पिता” प्रेम आणि सौम्यता आणि अधिकार आणि तरतूद आणि मार्गदर्शन. दर्शवितो. “राजा”
सत्ता आणि सार्वभौमत्व आणि संपत्तीचा सूचक आहे.

चौथे, न भिणे हे दर्शविते की देव किती मोकळ्या स्वभावाचा आणि उदार आहे. लक्ष द्या, तो
राज्य देतो. “हे लहान कळपा, भिऊ नकोस, कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या
पित्याला बरे वाटले आहे.” तो राज्य विकत नाही किंवा राज्य भाड्याने देत नाही किंवा
राज्य भाडेपट्टीवर देत नाही. तो अतिशय श्रीमंत आहे आणि त्याला आमच्याकडून मोबदला
देण्याची गरज नाही. तर, देव उदार आहे आणि विपुलतेतून मुक्तहस्ते देतो. आणि जेव्हा
आपण भीत नाही, तर आपल्या गरजांसाठी त्याच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा आपण
याविषयी त्याची वाखाणणी करतो.

शेवटी, न भिणे – काळजी न करणे – हे दर्शविते की देव ते खरोखर करू इच्छितो यावर
आपण विश्वास ठेवतो. “हे लहान कळपा, भिऊ नकोस, कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे
तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” त्यामुळे त्याला आनद होतो. तो जळफळत नाही.
आम्हाला राज्य देऊन तो आनंदित होतो. आमच्या सर्वांचेच पिता असे नव्हते, ज्यांना प्राप्त
करण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद वाटतो. पण ते दुःख आता मुख्य गोष्ट नाही, कारण आता
तुम्हाला असा पिता, मेंढपाळ आणि राजा मिळू शकतो.

म्हणून, या वचनाचा मुद्दा असा आहे की आपण देवाला आपला मेंढपाळ आणि पिता आणि
राजा म्हणून आपले धन समजले पाहिजे जो उदार होऊन आम्हास देवाचे राज्य देण्यात
आनंद मानतो – आम्हाला स्वर्ग देण्यासाठी, आम्हाला सार्वकालिक जीवन आणि आनंद
देण्यासाठी, आणि आम्हाला गरज असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी. तेथे जाण्यासाठी जर आपण
अशाप्रकारे देवाला आपले धन समजतो तर आपण निर्भय होऊ आणि देवाची उपासना केली
जाईल.

Posted on

21 April: आमुलाग्र प्रीतीची किल्ली

”माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे
वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे
प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.“
(मत्तय 5:11,12)

मत्तय 5:44 मधून आपल्या शत्रूंवर प्रीती करण्याविषयी संदेश देत असतांना जे प्रश्न मी
विचारले त्यापैकी एक होता, तुमचे अपहरण करणाऱ्या आणि मग तुमचा खून करणाऱ्या
लोकांवर तुम्ही कशी प्रीती कराल?

हे आम्ही कसे करू शकतो? अशाप्रकारची प्रीती करण्याची सामर्थ्य कोठून येते? वास्तविक
जगात जेव्हा ते प्रगट होते तेव्हा हे किती आश्चर्यकारक असते याचा विचार करा! ख्रिस्ताचे
सत्य आणि सामर्थ्य आणि वास्तविकता प्रीतीपेक्षा इतर कुठल्या गोष्टीद्वारे दाखविली जाऊ
शकतांत का?

माझा विश्वास आहे की येशू आम्हाला ह्या आमुलाग्र, आत्म-बलिदानात्मक प्रीतीची किल्ली
देतो, जिचे वर्णन याच अध्यायात पूर्वी, मत्तय 5:44 मध्ये करण्यात आले आहे.

मत्तय 5:11 मध्ये, तो पुन्हा एकदा छळ होण्याविषयी बोलत आहे, जसा तो बोलत होता
जेव्हा त्याने मत्तय 5:44 मध्ये म्हटले, “तुम्ही आपल्या वैर्‍यांवर प्रीती करा, आणि जे तुमचा
छळ करतात व तुमच्या पाठीस लागतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करा.“ या वचनांविषयी
उल्लेखनीय हे आहे की येशू म्हणतो की तुम्ही केवळ शत्रूचे गैरवर्तन सहन करण्यास समर्थच
होऊ नका, तर तुम्ही त्यात आनंदहि करा. “माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ
करतील… तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा व उल्लास करा.”

आनंद करनें आपल्या वैर्‍यांसाठी प्रार्थना करण्यापेक्षा किंवा त्यांचे कल्याण करण्यापेक्षा
आमच्या आटोक्याबाहेरचे वाटते. जर मी ही मानवीदृष्ट्या अशक्य गोष्ट करू शकलो –
म्हणजे, छळ होत असतांना आनंद करणे – तर माझा छळ करणाऱ्यांवर प्रीती करणे शक्य
होईल. जर अन्याय आणि यातना आणि हानीच्या दहशतीत आनंदाचा चमत्कार घडू शकला,
तर गुन्हेगारांप्रीत्यर्थ प्रीतीचा चमत्कारही घडू शकतो.

येशू या वचनांमध्ये आम्हाला आनंदाची गुरुकिल्ली देतो. तो म्हणतो, “आनंद करा, उल्लास
करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे” आनंदाची गुरुकिल्ली आहे देवाच्या भावी
कृपेवर विश्वास ठेवणे –म्हणजे, देव तुमच्यासाठी जे होण्याचे अभिवचन देतो त्यात
समाधानी असणे. तो म्हणतो, “आनंद करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे.”

छळवनूक होत असतांना आपला आनंद म्हणजे दहशतीच्या या क्षणी परत येण्याचा आणि
आम्हाला प्रीती करण्यासाठी स्वतंत्र करण्याचा स्वर्गाचा आनंद. म्हणून, हा आनंद म्हणजे
आपल्या शत्रूंवर प्रेम करण्याचे मुक्त सामर्थ्य आहे जेव्हा ते आपला छळ मांडतात.
जर ते खरे असेल, तर प्रीती करण्याची आज्ञा म्हणजे स्वर्गातील गोष्टींवर आपले मन
लावण्याची आज्ञा देखील आहे – देव आपल्यासाठी जे बनण्याचे अभिवचन देतो – पृथ्वीवरील
गोष्टींवर नाही (कलस्सै. 3:2).

आपल्या वैर्‍यांवर प्रेम करण्याची आज्ञा आमची आशा आणि आमच्या जीवाचे सखोल
समाधान आणि त्याचे सर्वात मोठे प्रतिफळ – त्याची भावी कृपा देवामध्ये शोधण्याची आज्ञा
आहे. आमूलाग्र प्रेमाची किल्ली भावी कृपेत विश्वास आहे. आमच्या वेदनेत आम्हास हे कळले
पाहिजे की देवाची प्रीती “जीवनाहून उत्तम” आहे (स्तोत्र 63:3). आपल्या वैर्‍यांवर प्रीती
केल्याने तुम्हाला स्वर्गात प्रतिफळ प्राप्त होत नाही. तर स्वर्गाचे प्रतिफळ जोपासल्याने
वैर्‍यांवर प्रीती करण्याचे सामर्थ्य तुम्हास प्राप्त होते.

Posted on

20 April :भटकून दूर जाण्याची भिती

तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणाऱ्यांकरता तू ते साठवून ठेवले आहेस, तुझा
आश्रय करणाऱ्यांसाठी मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहेस. (स्तोत्र 31:19).
स्तोत्र 31:19 मधील दोन महत्त्वपूर्ण सत्यांवर विचार करा.

 1. देवाचा चांगुलपणा
  देवाचे एक विशिष्ट चांगुलपण आहे. अर्थात, फक्त देवाचे ते सामान्य चांगुलपणच नव्हे जो तो
  सर्व लोकांवर प्रगट करतो, तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो (मत्तय 5:45), तर
  जसे स्तोत्र म्हणते, एक विशिष्ट चांगुलपण, “त्याचे भय धरणाऱ्यांसाठी”.

  हे चांगुलपण अमर्याद प्रमाणात थोर आहे. ते विपुल आहे. ते कायम टिकून राहते. ते
  सर्वसमावेशक आहे. जे त्याचे भय धरतात फक्त त्यांच्यासाठी हे चांगुलपण आहे. सर्व काही
  त्यांच्या भल्याकरिता एकत्र मिळून कार्य करते (रोम 8:28) – रोम 5:3 आणि 5 नुसार त्यांच्या
  वेदना देखील सर्व-कल्याणकारक आहेत.

  पण जे त्याचे भय धरत नाहीत त्यांना तात्पुरता चांगुलपणा लाभतो. रोमकरांस 2: 4 आणि 5
  याचे असे वर्णन करते: ”किंवा देवाची ममता तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू
  त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? की, आपल्या
  हटवादीपणाने पश्चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या
  प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस?” ममता. क्षमा. सहनशीलता.
  चांगुलपण. पण ते परमेश्वराचे भय धरतांत म्हणून नव्हे तर त्यांच्या हटवादीपणामुळें.
  हे पहिले सत्य आहेः परमेश्वराचे चांगुलपण.
 2. परमेश्वराचे भय
  परमेश्वराचे भय म्हणजे त्याच्यापासून भटकून दूर जाण्याचे भय आहे. त्यामुळे, ते देवाचा आश्रय
  घेण्यात व्यक्त होते. म्हणूनच स्तोत्र 31:19 मध्ये दोन अटींचा उल्लेख केलेला आहे – परमेश्वराचे
  भय बाळगणे आणि त्याच्याठायी आश्रय घेणे. “तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय
  धरणारयांकरता तू ते 1) साठवून ठेवले आहेस, 2) तुझा आश्रय करणणाऱ्यांसाठी

मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहेस.” ते विरुद्ध असल्यासारखे वाटतात. भय दूर सारत
असल्यासारखे वाटते आणि आश्रय घेणे जवळ ओढल्यासारखे वाटते. परंतु जेव्हा आपण पाहतो
की हे भय पळून जाण्याचे भय आहे – त्याजपासून दूर भटकून जाण्याचे भय आहे – तेव्हा ते
एकत्र काम करतात.

पवित्र जणांच्या अंतःकरणात खरा थरकाप असतो. ”भीत व कापत आपले तारण साधून घ्या.“
(फिलिप्पै 2:12). पण हा थरकाप त्या पित्याच्या बाहूंत वाटणारा थरकाप आहे ज्याने नुकतेच
आपल्या मुलाला समुद्राच्या पृष्ठभागाखालील प्रवाहातून बाहेर काढले आहे. आम्हाला पित्याची
गरज नाही हा विचार करण्याच्या भयंकर संभावनेचा हा थरकाप आहे.

म्हणून, देवाच्या चांगुलपणाची जोपासणूक करा. त्याच्यापासून भटकून दूर जाण्याच्या
विचाराने भयभीत व्हां. प्रत्येक पापापासून पळ काढा आणि त्याच्याठायी आश्रय घ्या. “तुझे
चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणाऱ्यांकरता तू ते साठवून ठेवले आहेस, तुझा आश्रय
करणाऱ्यांसाठी मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहेस!”

Posted on

19 April: विफल झालेल्यांचे भविष्य

“भिऊ नका, हे दुष्कर्म तुम्ही केले आहे खरे, पण आता परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून
दुसरीकडे वळू नका, तर मनोभावे परमेश्वराची सेवा करा; ज्या निरर्थक वस्तूंपासून तुम्हांला
काही लाभ किंवा तुमचा उद्धार होणे शक्य नाही त्यांच्यामागे लागू नका, कारण त्या केवळ
निरर्थक होत. परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, कारण
परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हांला आपले प्रजाजन केले आहे.” (1 शमुवेल 12:20-22).

जेव्हा इस्राएली लोकांना त्यांनी शमुवेलाला इतर राष्ट्रांप्रमाणे राजा मिळावा म्हणून अशी
मागणी केल्याबद्दल भयभीत केले केलें आणि त्यांनी केलेल्या पापाबद्दल पश्चात्ताप करण्यास
सांगितले, तेव्हा ही चांगली बातमी येतेः “भिऊ नका; हे दुष्कर्म तुम्ही केले आहे खरे.” ते किती
उलट वाटते हे तुम्ही ऐकता का – किती अद्भुतरित्या उलट? तुंम्हाला वाटेल त्यानें असे
म्हणावयाला पाहिजे होते, “भीती बाळगा, कारण हे दुष्कर्म तुम्ही केले आहे.” हे घाबरण्याचे
उत्तम कारण आहेः देवाशिवाय दुसरा राजा मागण्याचे मोठे दुष्कृत्य तुम्ही केले आहे! पण
शमूवेलाने तसे म्हटले नाही. “भिऊ नका; हे दुष्कर्म तुम्ही केले आहे खरे.”

पुढे तो असे म्हणतो, “पण आता परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून दुसरीकडे वळू नका, तर
मनोभावे परमेश्वराची सेवा करा; ज्या निरर्थक वस्तूंपासून तुम्हांला काही लाभ किंवा तुमचा
उद्धार होणे शक्य नाही त्यांच्यामागे लागू नका, कारण त्या केवळ निरर्थक होत.”

ही ती सुवार्ता आहे: तुम्हीं महा पाप केले खरे, आणि परमेश्वराचा भयंकर अनादर केला खरे,
जरी तुम्हाला आता एक राजा मिळाला आहे ज्याची मागणी करण्याचे दुष्कर्म तुम्ही केले होते,
जरी त्या पापास किंवा त्याचे दुःखदायक परिणाम जे अद्याप तुमच्यावर प्रगट झालें नाहींत,
परत बदलता येत नाही, तरीही एक भविष्य आणि आशा आहे. तुम्हांवर दया केलीं जाईल.
भिऊ नका! भिऊ नका!

मग 1 शमुवेल 12:22 मध्ये सुवार्तेचा मोठा आधार येतो – सुवार्तेचा आधार आणि पाया. हे सर्व
दुष्कर्म करूनही तुम्हाला भिण्याची गरज का नाही? “परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या
लोकांचा त्याग करणार नाही, कारण परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हांला आपले प्रजाजन केले
आहे.”

सुवार्तेचा आधार आहे देवाची त्याच्या स्वतःच्या नामास्तव असलेली वचनबद्धता. तुम्हांला हे
कळलें का? तुम्ही पाप केले असले तरी भिऊ नका, “परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या
लोकांचा त्याग करणार नाही.” याचा तुमच्यावर दोनप्रकारे परिणाम घडून यायला पाहिजे :
अंतःकरण विदारून टाकणारी नम्रता आणि पायांनी नृत्य करावा इतका आनंद. नम्रता कारण
तुमच्या तारणाचा पाया तुमची योग्यता नाही. आनंद कारण तुमचे तारण हे देवाच्या स्वतःच्या
थोर नामास्तव असलेल्या निष्ठेइतकेच खात्रीलायक आहे. हि खात्री आमच्या कल्पनेपलीकडे
आहे.

Posted on

18 April: देवा, आमच्या अंतःकरणांस स्फूर्ती दे

शौलही गिबा येथे आपल्या घरी गेला. ज्या सैनिकांच्या मनांस देवाकडून स्फूर्ती झाली ते
त्याच्याबरोबर गेले. (1 शमुवेल 10:26).

या वचनात काय म्हटले आहे यावर काहीं क्षण विचार करा. देवाने त्यांना स्फूर्ती दिलीं, किंवा
देवानें त्यांना स्पर्श केला. बायकोने नाही. मुलाने नाही. पालकाने नाही. सल्लाकाराने नाही.
तर देवाने. देवाने त्यांना स्फूर्ती दिलीं/स्पर्श केला.

त्यानें जो जो विश्वात अपरिमित सामर्थ्याचा धनी आहे. अनंत अधिकार आणि अनंत ज्ञान आणि
अमर्याद प्रेम आणि अमर्याद चांगुलपणा आणि अमर्याद पवित्रता आणि अपरिमित न्याय
असलेला. त्या देवानें त्यांच्या मनांस स्फूर्ती दिलीं.

बृहस्पतिचा परिघ रेणूच्या काठास कसा स्पर्श करतो? त्याच्या नाभीत प्रवेश करणे तर दूर
राहिले?
देवाचा स्पर्श किंवा त्याचे मनांस स्फूर्ती देणे अद्भुत आहे, केवळ यामुळे नाही की स्पर्श करणारा
वा स्फूर्ती देणारा देव आहे, तर यामुळे देखील की तो स्पर्श आहे. हा एक वास्तविक संबंध आहे.
त्या स्पर्शाचा संबंध आमच्या मनांशी असणें हे अद्भुत आहे. स्पर्शाचा संबंध देवाबरोंबर आहे हे
अद्भुत आहे. आणि तो वास्तविक स्पर्श आहे हे अद्भुत आहे.

शूर पुरुषांना उद्देशून फक्त बोलले जात नव्हते. त्यांच्यावर केवळ दैवी प्रभाव टाकीला जात
नव्हता. त्यांची केवळ भेंट घेऊन निवड केलीं गेलेली नव्हती. देवाने, आपल्या अमर्याद
कृपाळूतेने, त्यांच्या मनांस स्फूर्ती दिलीं. देव इतका जवळ होता. तरी ते भस्म झाले नाहीत.
मला तो स्पर्श आवडतो. मला तो आणखी हवा आहे. माझ्यासाठी आणि तुम्हा सर्वांसाठी. मी
प्रार्थना करतो की देवानें मला त्याच्या गौरवाने आणि या गौरवाप्रीत्यर्थ नव्याने स्पर्श करावा.
मी प्रार्थना करतो की त्याने आम्हा सर्वांच्या मनांस स्फूर्ती द्यावी.

ओहो, देवाचा तो स्पर्श मिळावा! जर तो स्पर्श अग्नीसह करण्यांत आला, तर तसेच व्हावे. जर
तो पाण्याने केला जात असेल तर असेच व्हावे. तो वाऱ्याने केला जात असेल तर तो तसाच
व्हावा. जर तो मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह होत असेल, तर आपण तो समर्पित
अंतकरणाने घेऊं.

हे परमेश्वरा, ये. इतक्या जवळ ये. भस्म कर आणि भिजव आणि वार कर आणि चुरगळा कर.
किंवा शांत आणि मंदपणे, ये. ये. आमच्या अंतःकरणास स्पर्श कर.

Posted on

17 April: येशूला कवटाळणे

देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत
कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते; आणि ज्याने जगावर जय
मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. (1 योहान 5:3-4).

लक्ष द्याः देवावर प्रीती करणे हे केवळ त्याच्या आज्ञांचे पालन करणे नव्हे. तर देवावर प्रीती
करणे देवासाठी एका विशिष्ट प्रकारचे अंतःकरण बाळगणे कीं जेणेकरून आज्ञा पाळणे कठीण
असणार नाही. योहान हेच म्हणतो. पण मग तो हे सत्य प्रीतीच्या संदर्भात न मांडता तो ते नवा
जन्म कठीण नाहीत: “जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर विजय मिळवते. म्हणून,
नवा जन्म म्हणजे देवाच्या आज्ञा त्याला बोजड वाटत नाही आणि आज्ञेचे पालन करतांना
जगीक अडचणींवर मात करतो.

आणि शेवटी तो पुढे म्हणतो, “आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास“
म्हणून, नवा जन्म भारमुक्त आज्ञापालनाप्रत येणाऱ्या सर्व जगीक अडचणींवर मात करतो,
कारण नवा जन्म विश्वासात वाढ करतो. म्हणून, नव्या जन्माचा चमत्कार विश्वास उत्पन्न
करतो, अत्यंत संतोषकारक म्हणून ख्रिस्तामध्ये आपल्यासाठी देव जो काही आहे ते स्वीकारतो,
जे जगाच्या परीक्षांपेक्षा देवाप्रत आज्ञाधारकतेस अधिक इच्छिण्यायोग्य बनवते. आणि देवावर
प्रीती करण्याचा हाच अर्थ आहे.

अठराव्या शतकातील पाळक आणि पवित्र शास्त्राचे विद्वान जोनाथन एडवर्ड्स यांनी या
वचनाशी संघर्ष केला आणि असा निष्कर्ष काढला, “तारणदायक विश्वास . . . प्रेम अभिव्यक्त
करतो. . . देवावरील आमचे प्रेम आम्हाला देवाच्या आज्ञा पाळण्यात येणाऱ्या अडचणींवर मात
करण्याचे सामर्थ्य देते – जे दर्शविते की तारणदायक विश्वासात, त्याचे जीवन आणि सामर्थ्य
यात प्रेम ही मुख्य गोष्ट आहे, ज्याद्वारे ते मोठे परिणाम घडवून आणतात.”
माझ्या मते एडवर्डचे बरोबर आहे आणि बायबलमधील असंख्य वचने तो जे काही म्हणतो त्याचे
समर्थन करतात.

असे म्हणण्याची आणखी एक पद्धत ही की ख्रिस्तावरील विश्वास देव आमच्यासाठी काय आहे
याची केवळ सहमती देणेच नाही तर तो ख्रिस्तामध्ये आमच्यासाठी जो काही आहे त्या सर्वांचा
स्वीकार करणे देखील आहे. “खरा विश्वास ख्रिस्ताचा त्याप्रकारे स्वीकार करतो ज्या प्रकारे
पवित्र शास्त्र दरिद्री पापी लोकांप्रत त्यास सादर करतो” – हे एडवर्ड्सचे दुसरे उद्धरण आहे. हे
“कवटाळणे” ख्रिस्तावरील एक प्रकारचे प्रेम आहे – असे प्रेम जे त्याला इतर सर्व गोष्टींपेक्षा
अधिक मूल्यवान समजते.

म्हणून, एकीकडे 1 योहान 5:3, जे म्हणते देवासाठी आमची प्रीती आम्हाला त्याच्या आज्ञांचे
पालन करण्यास समर्थ बनविते, आणि दुसरीकडे, 4थे वचन जे म्हणते की आमचा विश्वास
देवाच्या आज्ञांचे पालन करण्यापासून आम्हास रोखणाऱ्या अडखळणांवर मात करतो, यांत
विरोधाभास नाहींच. देव आणि ख्रिस्त ह्यांच्यावर प्रीती विश्वासात गर्भित आहे.

मग योहान आज्ञा पाळणाऱ्या विश्वासाची अशा प्रकारे व्याख्या करतो “येशू देवाचा पुत्र आहे
असा विश्वास जो धरतो” (1 योहान 5:5). हा विश्वास वर्तमान येशूला गौरवी दैवी व्यक्ती जो
तो आहे असे म्हणून “स्वीकार करतो.” हे फक्त या सत्यास सहमति देणे नव्हे की येशू हा देवाचा

पुत्र आहे, कारण दुरात्मेसुद्धा हे मान्य करतात. “तेव्हा पाहा, ते ओरडून म्हणाले, “हे येशू,
देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हांला पिडण्यास येथे आला
आहेस काय?” (मत्तय 8:29). येशू हा देवाचा पुत्र आहे हा विश्वास करण्याचा अर्थ त्या सत्याचे
महत्व – वास्तविकतेचे मूल्य “स्वीकार करणे” होय. याचा अर्थ देवाचा पुत्र म्हणून ख्रिस्तासोबत
आणि त्याच्याठायी देव आमच्यासाठी जे काही आहे त्यात संतुष्ट होणे होय.

“देवाचा पुत्र” म्हणजे येशू हा त्याच्या पित्याच्या उजवीकडे असलेला विश्वातील सर्वात श्रेष्ठ
व्यक्ती आहे. म्हणून, त्याने जे काही शिकवले ते खरे आहे, आणि त्याने जे काही अभिवचन दिले
ते स्थिर राहील आणि आत्म्यास संतुष्ट करणारी त्याची सर्व महानता कधीही बदलणार नाही.
म्हणून, तो देवाचा पुत्र आहे हा विश्वास धरणे, या सर्वांवर अवलंबून राहणे, आणि त्यात संतुष्ट
होणे होय.

Posted on

16th April: आजच्यासाठी करुणा

आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही.ती
रोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे. (विलापगीत 3:22-23).

परमेश्वराची करुणा रोज सकाळी नवी होते कारण दररोज त्या दिवसासाठी पुरेशी करुणा
मुबलक प्रमाणांत उपलब्ध असते. देव प्रत्येक दिवसाचे दुःख ठरवितो. तसेंच देव प्रत्येक
दिवसासाठी करुणा देखील ठरवितो. त्याच्या मुलांच्या जीवनात, दु:ख व करुणा परिपूर्णपणे
ठरविण्यात आलेलें आहेंत. येशूने म्हटले, ”ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची
चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.“ (मत्तय 6:34). ज्या दिवसाचे दुःख त्या
दिवसाला पुरे. प्रत्येक दिवशी त्याची दया किंवा करुणा ठरविली आहे. प्रत्येक दिवस दर सकाळी
नवा होतो.
परंतु जेव्हा आपल्याला वाटते की आजच्या साधनसामुग्रीवर उद्याचा भार आपल्याला सहन
करावा लागू शकतो तेव्हा आपण कित्येकदा निराश होतो. देवाला वाटते की आपण हे जाणावे
की असे होणार नाही. आजची करुणा आजच्या दुःखांसाठी आहे. उद्याची करुणा ही उद्याच्या
दुःखांसाठी असणार आहे.

कधीकधी आपण विचार करतो की भयंकर परीक्षेत स्थिर उभे राहण्यासाठी आम्हांवर करुणा
केलीं जाईल कीं नाहीं. होय, केलीं जाईल. पेत्र म्हणतो, ”ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत
असल्यास तुम्ही धन्य आहात; कारण गौरवाचा आत्मा म्हणजे ‘देवाचा आत्मा’ तुमच्यावर येऊन
‘राहिला आहे.’ त्यांच्याकडून त्याची निंदा होते, पण तुमच्याकडून तो गौरविला जातो“ (1 पेत्र
4:14). जेव्हा निंदा होते, तेव्हा गौरवाचा आत्मा येतो. स्तेफनाला दगडमार होत असतांना असे घडले.
तुमच्यासाठी देखील असेंच घडेल. जेव्हा आत्म्याची आणि गौरवाची गरज भासेल, तेव्हा
ते येतील.

रानात मान्ना एका दिवसाला एकदाच दिला जात असे. साठवणूक करायची नव्हती. देवाच्या
दयेवर आपण अशाच प्रकारे अवलंबून राहिले पाहिजे. उद्याची ओझी उचलण्याचे बळ तुम्हाला
आज प्राप्त होणार नाही. आजच्या दुःखांसाठी तुम्हाला करुणा देण्यात आली आहे.

उद्या करुणा नवी होईल. ”ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हांला
बोलावले तो देव विश्वसनीय आहे.“ (1 करिंथ 1:9).

Posted on

15 April: खेचरासारखे होऊ नका.

“निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्यांसारखे होऊ नका; त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी
सामग्री पाहिजे, नसली तर ती तुझ्याजवळ येणार नाहीत.” (स्तोत्र 32:9).

असे कल्पनाचित्र रंगवा की देवाचे लोक सर्व प्रकारच्या प्राण्यांचे खळे आहे. देव त्याच्या
प्राण्यांची काळजी घेतो, त्यांना कोठे जायचे आहे ते दाखवतो, आणि त्यांच्या जीवनासाठी
धान्याचे कोठार बांधतो.

परंतु प्राण्यांच्या ह्या खळ्यांत एक जनावर आहे जे देवाला भयंकर त्रास देते, ते म्हणजे
खेचर. ते मूर्ख आहे आणि ते हट्टी आहे आणि यांपैकी कोणता अवगुण प्रथम आहे हे तुम्ही
ओळखू शकत नाही – हट्टीपणा की मूर्खपणा.

आता देव ज्या प्रकारे त्याच्या प्राण्यांना अन्न देण्यासाठी आणि त्यांना निवारा देण्यासाठी
कोठारात नेतो ते हे शिकवून की त्यांना सर्वांना एक वैयक्तिक नाव आहे आणि नंतर त्यांना
नावाने हाक मारणे. ”मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण
तुला देईन” (स्तोत्र 32:9).

पण खेचर त्या प्रकारच्या बोधाला किंवा मार्गदर्शनाला प्रतिसाद देणार नाही. त्याला समज
नाही. म्हणून देव त्याच्या पिक-अप ट्रकमध्ये बसतो आणि शेतात जातो, खेचराच्या तोंडात
ओठाळी आणि लगाम घालतो, त्याला ट्रकला जुंपतो आणि त्याला ओडत खळ्यात नेतो जेथे
तो ताठ पायांनी आणि फुरफुरत जातो.

देवाची अशी पद्धत नाही की त्याच्या प्राण्यांनी त्याच्याकडे आशीर्वाद आणि संरक्षणासाठी
अशाप्रकारे यावे.

पण एक दिवस असा येईल जेव्हां त्या खेचराला खूप उशीर झालेला असेल. त्याच्यावर
गारांचा वार होणार आहे आणि विजेचा कडकडाट होणार आहे, आणि जेव्हा तो धावत येईल
तेव्हा खळ्याचे दार बंद झालेलें असेल.

म्हणून, खेचरांसारखे होऊ नका. “निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्यांसारखे होऊ नका; त्यांना
आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे, नसली तर ती तुझ्याजवळ येणार
नाहीत.”

त्याऐवजी, देव पावण्याची संधी आहे तोच प्रत्येक भक्ताने त्याला प्रार्थना करावी (स्तोत्र
32:6).

खेचरासारखे न होणें म्हणजे स्वतःला नम्र करणे, प्रार्थनेत देवाकडे येणे, आपली पापे कबुल
करणे आणि शेतातील गरजू लहान पिल्लांप्रमाणे त्याच्या संरक्षणाच्या आणि तरतूदीच्या
खळ्यात जाण्यासाठी देवाचे मार्गदर्शन स्वीकारणे.

Posted on

14 April: त्याच्या प्रसिद्धीसाठी (गौरवासाठी) प्रार्थना करा


“ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा: ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र
मानले जावो.” (मत्तय 6:9).

पवित्र शास्त्र अनेकदा म्हणते की देव “त्याच्या नावासाठी” कार्य करतो.

 तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो. (स्तोत्र 23:3)
 हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी माझ्या दुष्टाईची क्षमा कर. (स्तोत्र 25:11)
 त्याने आपल्या नावासाठी त्यांचे तारण केले. (स्तोत्र 106:8)
 माझ्या नामाप्रीत्यर्थ मी आपला क्रोध लांबणीवर टाकला. (यशया 48:9)
 कारण त्याच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा झाली आहे. (1 योहान
2:12)

जर तुम्ही विचाराल की त्या सर्व वाक्यांत कोणती गोष्ट परमेश्वराचे अंतःकरण द्रवित करीत
आहेत (आणि अनेकांस ते आवडतात), तर उत्तर हे आहे की देव यांत प्रसन्न होतो की त्याचे
नाव कळविले जावे आणि त्याचा आदर केला जावा.

पहिली आणि सर्वात महत्त्वाची प्रार्थना जी करता येऊ शकते ती आहे, “तुझे नाव पवित्र
मानले जावो.” मला असे वाटत होते की ही एक प्रशंसा आहे. जसे, “हालेलुया! प्रभूचे नाव
पवित्र आहे!” पण ती प्रशंसा नाही. ती एक विनंती आहे. वास्तविक एक प्रकारचा आदेश
किंवा आज्ञा. प्रभु, असेंच होऊं दे! ते पवित्र मानिले जाऊं दे. तुझे नाव पवित्र मानले जावो.
ही माझी विनंती, माझी प्रार्थना आहे. मी यासाठी तुला आग्रह करीत आहे: लोकांना तुझे
नाव पवित्र मानावयास प्रवृत्त कर. मला तुझे नाव पवित्र मानावयास उत्तेजन दे!

जास्तीत जास्त लोकांनी त्याचे नाव “पवित्र” मानावे हे देवाला आवडते. म्हणूनच त्याचा पुत्र
ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांस त्यासाठी प्रार्थना करावयास शिकवतो. वस्तुतः, येशू हिला सर्वात

पहिली आणि सर्वश्रेष्ठ प्रार्थना ठरवतो. कारण हा पित्याचा प्रथम आणि सर्वांत मोठा आवेश
आहे.

“प्रभु, अधिकाधिक लोकांना तुझे नाव पवित्र मानण्याची प्रेरणा दे,” अर्थात, तुझ्या नावाचा
आदर, प्रशंसा, मान, विचार, सन्मान, श्रद्धा, आणि स्तुती होऊ दे. अधिकाधिक लोकांनी ते
करावें! म्हणून, आपण पाहू शकता की मुळांत ही एक सुवार्तिक प्रार्थना आहे.

Posted on

13 April: तुमच्या अश्रूंना बोला

“जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत
बाहेर पडतो तो खातरीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल.” (स्तोत्र 126:5-6).
बी पेरण्याविषयी दुःखद काहीही नाही. त्यासाठी कापणीपेक्षा जास्त श्रम लागत नाही.
दिवस सुंदर असू शकतात. कापणीसाठी मोठी आशा असू शकते.

तरीही स्तोत्र “अश्रूपूर्ण नेत्रांनी” पेरणी करण्याविषयी सांगते. ते म्हणते की कोणीतरी
“पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो.” तर, ते का रडत आहेत?

मला वाटते की त्याचे कारण हे नाही की पेरणी करणे दुःखाचे आहे किंवा पेरणी कठीण आहे.
मला असे वाटते की रडण्याचा संबंध पेरणीशी मुळीच नाही. पेरणी हे फक्त काम आहे जे
आपल्याला तेव्हांही केले पाहिजे जेव्हां आमच्या जीवनात रडवणाऱ्या गोष्टी असतांत.

आमचे दुःख करणे समाप्त होईपर्यंत किंवा आमच्या सर्व समस्यांचे निवारण केलें जाईपर्यंत
पिके थांबणार नाहीत. जर आम्हाला पुढच्या हिवाळ्यात खायचे असेल, तर आम्हाला शेतात
जावे लागेल आणि बी पेरावे लागेल, आम्ही रडत असू वा नसू.

जर तुम्ही असे करता, तर स्तोत्राचे अभिवचन हे आहे की तुम्ही “हर्षाने कापणी कराल.”
तुम्ही “आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन” घरी याल. यासाठी नाही की पेरणीच्या
आसवांमुळे कापणीचा आनंद उत्पन्न होतो, तर निव्वळ पेरणीमुळे कापणी होते, आणि जरी
तुमचे अश्रू तुम्हाला पेरणी सोडून देण्यास मोहात पाडत असले, तरीही तुम्हाला हे लक्षात
ठेवण्याची गरज आहे.
तर, धडा हा आहेः जेव्हा साधी, सरळ कामे करावयाची असतात, आणि तुमचे अंतःकरण
दुःखाने भरलेले असेल, आणि तुमची आसवे सहज वाहत असतील, तेव्हा पुढे जा आणि
अश्रूंसोबतच कामे करा. वास्तववादी बना. आपल्या अश्रूंना म्हणा, “अश्रूंनो, मला तुमची
जाणीव आहे. तुम्ही माझ्यात जीवनाचा त्याग करण्याची इच्छा उत्पन्न करता. पण शेतात
पेरणी करावयाची आहे (भांडी धुवायची, गाडी दुरूस्त करावयाची, उपदेश लिहावयाचा
आहे).”

मग, देवाच्या वचनाच्या आधारे म्हणा, “अश्रूंनो, मला माहित आहे की तुम्ही सदाकाळ
टिकणार नाही. मी माझे काम (अश्रू आणि सर्व) करतो फक्त ही वस्तुस्थिती शेवटी
आशीर्वादाची कापणी आणील. म्हणून, पुढे जा आणि जरूरी असेल तर वाहत रहा. पण
माझा विश्वास आहे – जरी मला ते अद्याप दिसत नसले किंवा ते पूर्णपणे जाणवत नसले –
तरी माझा विश्वास आहे की माझ्या पेरणीचे साधे काम कापणीच्या पेढ्या घेऊन येईल.
आणि माझे अश्रू आनंदात बदलतील.”